¡Sorpréndeme!

Top 90 | टॉप 90 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 12 April 2025

2025-04-12 1 Dailymotion

Top 90 | टॉप 90 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 12 April 2025

शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शाह रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार, अमित शाह आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट, राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता

अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडावरील रोपवे सुरूच राहणार, सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेशबंदी नाही, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सरकारच्या अनेक खात्यांच्या वेबसाईटवर सायबर हल्ल्याचा धोका, सायबर सेलच्या तपासात गंभीर बाब समोर, पोलीस, डीजीआयपीआर, महावितरण,एमपीएससीच्या वेबसाईट डेंजर झोनमध्ये...

मुंबईत पाणीटँकर संघटनेचा संप सुरूच, हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणीटंचाई, चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, ४८ तासांत तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा

मुंबईत रखडलेल्या ६८ झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आता महापालिकेवर, सरकारकडून बीएमसीला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा...